breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘इंडिया आघाडी २९५ पार करणार’; मल्लिकार्जुन खर्गे यांचा दावा

Exit Poll 2024 : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची शनिवारी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर इंडिया लोकसभेच्या २९५ पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. आम्ही नमूद केलेला आकडा जनतेच्या सर्वेक्षणावर आधारित असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

खर्गे यांच्या पुढाकारातून त्यांच्या निवासस्थानी इंडियाची बैठक झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती खर्गे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली. मतमोजणीच्या दिवशी घ्यावयाची काळजी आणि घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना द्यावयाच्या सूचना यावर प्रामुख्याने चर्चा झााली. सरकारी मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) माध्यमातून एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

त्यामुळे आम्ही जनतेला सत्य सांगू इच्छितो, असे म्हणत त्यांनी इंडिया किती जागा जिंकेल याविषयीचा आकडा नमूद केला. सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्या आकड्यापर्यंत पोहचलो आहोत. जनतेकडून त्याविषयीची माहिती आमच्या नेत्यांना प्राप्त झाली. सरकारी सर्वेक्षणे येतील. सरकारचे प्रसारमाध्यमांमधील मित्र आकडे फुगवून सांगतील.

हेही वाचा    –    महत्वाची बातमी! जून महिन्यात बदललेले ‘हे’ नियम 

त्यामुळे आम्ही वस्तुस्थिती मांडत आहोत, असे खर्गे म्हणाले. मतदानाच्या आकडेवारीशी संबंधित फॉर्म १७सी विषयी इंडियाकडून घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय, कार्यकर्त्यांना निकाल जाहीर होईपर्यंत मतमोजणी केंद्रांमध्येच थांबण्यास सांगण्यात येणार आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत घटक पक्षांच्या ऐक्याचे दर्शन घडले. त्या बैठकीला सोनिया आणि राहुल गांधी या कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षांबरोबरच ज्येष्ठ नेते शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित राहिले.

त्याशिवाय, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी.राजा, झामुमोच्या नेत्या कल्पना सोरेन, द्रमुक नेते टी.आर.बालू, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई हेही बैठकीला उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button